![]() |
महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञकाचा शॉक बसून जागीच मृत्यू |
लोणी काळभोर : हॅलो प्रभात
येथील महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञकाचा शॉक बसून जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रायवाडी येथील परीसरात नवीन कॅनल येथे घडली. ही घटना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. विद्युत प्रवाहाला चिटकून वरिष्ठ तंत्रज्ञकाचा मृत्यू झाला आहे.
प्रज्ञापाल प्रकाशराव सोनसळे (वय 45, रा. लोणी काळभोर,) असे मृत्यू झालेल्या वरिष्ठ तंत्रज्ञकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्ञापाल सोनसळे हे महावितरणच्या लोणी काळभोर शाखेत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम पाहत होते.
![]() |
Join Our WhatsApp Group |
सोनसळे हे शनिवारी दुपारच्या सुमारास रायवाडी परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम करत होते. काम करत असताना त्यांना अचानक विजेचा शॉक बसून ते जमिनीवरती कोसळले. दरम्यान, त्यांना तातडीने लोणी काळभोर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासले असता त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे लोणी काळभोर सह परिसरात शोककळा पसरली आहे.