![]() |
खाजगी ट्रॅव्हल्स पलटी होऊन 21 प्रवासी जखमी |
टेंभुर्णी : हॅलो प्रभात
आढेगाव हद्दीत, सोलापूर-पुणे दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर आज पहाटे ०३:५१ वाजण्याच्या सुमारास साई गणेश ट्रॅव्हल्स (MH 48 K 1981) या खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. अहमदपूर (जि. लातूर) येथून पुण्याच्या दिशेने जात असताना ट्रॅव्हल्स पलटी होऊन सुमारे ३५ ते ४० प्रवाशांपैकी ३ प्रवासी गंभीर जखमी, तर १७ ते १८ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे रात्रगस्त अधिकारी झङख धापटे, हायवे पेट्रोलिंगचे क्ल ८६२ पवार, झल २१४५ इंगोले, अपघात पथकाचे क्ल १७१९ सरडे, तसेच पोलीस मित्र क्ल १८८६ कदम व इतर अधिकारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. पोलीस व पोलीस मित्रांच्या मदतीने सर्व प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले.
![]() |
Join Our WhatsApp Group |
सदर अपघातानंतर टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनीही अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली. अॅम्ब्युलन्सच्या साहाय्याने टेंभुर्णी येथील मार्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सध्या सर्व जखमींवर योग्य उपचार सुरू असून, अपघातग्रस्त प्रवाशांच्या नातेवाईकांनी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातानंतर ट्रॅव्हल्सचा चालक घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. प्राथमि क माहितीनुसार, चालकाला झोप आल्यामुळे गाडीवरील ताबा सुटून डाव्या बाजूला पलटी झाल्याचे दिसून आले आहे. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलीसांनी तत्काळ रस्त्यावरील अडथळा दूर करून वाहतूक सुरळीत केली.