![]() |
| शिरोळ पोलिसांची धडक कारवाई अवैध स्फोटकांचा साठा जप्त ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल |
जयसिंगपूर : हॅलो प्रभात
शिरोळ पोलीस ठाणे हद्दीतील नांदणी (ता. शिरोळ) गाव परिसरात अवैधरित्या डेटोनेटर व जिलेटीन कांड्या साठवून विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी छापा टाकून सुमारे १ लाख ८२ हजार ८८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दीपक शामराव वडर (वय ३५, रा. तळसंदे, ता. हातकणंगले) व नागेश गाडीवडर (रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ) यांच्याविरुद्ध शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.
.png)
