गुंड गजा मारणे आता जि.प.निवडणुकीच्या रिंगणात

Admin
पुणे : हॅलो प्रभात
पुण्यासारख्या शहरात चक्क तुरुंगात असलेल्या उमेदवारांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती उतरल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय तरी काय? असा प्रश्न पडला आहे. जाहीर सभांमध्ये गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांच्या उच्चाटनाची भाषा करणारे काही नेते प्रत्यक्षात अपप्रवृत्तींना राजाश्रय देत असल्याचा आरोप होत असताना तोच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना तिकीट देत आहेत. गुन्हेगारी जगतातुन थेट राजकारणात होणारी ही एन्ट्री चर्चेचा विषय ठरली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत माजी नगरसेवक स्व. वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर यांनी शिवसेनेचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव केला. तर लक्ष्मी आंदेकर यांनी भाजपच्या ऋतुजा गडाळे यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला.
 

हत्या प्रकरणात सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर गजा मारणेच्या पत्नी जयश्री मारणे यांना देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्याच्या पत्नीचा निवडणुकीत पराभव झाला आहे. गजा मारणे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गज्या मारणे टोळीचा ‌’शार्प शुटर‌’ म्हणून ओळख असलेला एक डॉन थेट जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्याला शिवसेनेने तिकीट दिले आहे,. मारणे टोळीचा ‌’शार्प शुटर‌’ सुनील बनसोडे हा तुळजापूर तालुक्यातील शहापूर जिल्हा परिषद गटातुन शिवसेनेच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात आहे. मारणे टोळीचा ‌’उजवा हात‌’ आणि टोळीतील ‌’टॉप हँड‌’ म्हणून बनसोडे हा ओळखला जातो. त्याच्यावर विविध गुन्ह्याची नोंद आहे. अनेक वर्षांपासून फरार असलेल्या बनसोडेला पुणे पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी वारजे माळवाडी येथून अटक केली होती.
To Top