जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी प्रचारच न करण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय

Admin
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी
प्रचारच न करण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय

पुणे : हॅलो प्रभात
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये दु:खाचं वातावरण आहे. शिवाय पक्ष पोरका झाल्याची भावनादेखील अनेक नेत्यांनी बोलून दाखवली आहे. एकीकडे अजित पवारांचं निधन झालं तर अवघ्या काही दिवसांवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आल्या आहेत, याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
 

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या निधनानंतर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी या निवडणुकीत प्रचार आणि रोड शो करणार नाही, तर केवळ मतदारांना पत्रके वाटून प्रचार करणार आहे. ‌’ उमेदवारांनी घरोघरी जाऊन पत्रके वाटून निवडणूक लढवावी असा आदेश पक्षाकडून देण्यात आला आहे. शिवाय विजयी झाल्यांनतरही मिरवणूक काढली जाणार नाही, असं सांगितलं जात आहे. 


त्यामुळे आता राज्यात अजित पवारांच्या निधनानंतर तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला असतानाच आता पक्षाने देखील या शोकाकूल वातावरणात प्रचार न करण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या पश्चात पक्षाची धुरा कुणाकडे जाणार? या चर्चांना देखील उधाण आलं आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्ो आणि पदाधिकाऱ्यांकडून पक्षाचे नेत्ृात्व सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवून त्यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केली जात आहे, दरम्यान, या संदर्भात राष्ट्रवादीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
Tags
To Top