'त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात...' शपथविधी पार पडताच रोहित पवारांची पोस्ट वायरल

Admin
'त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात...'
शपथविधी पार पडताच रोहित पवारांची पोस्ट वायरल

मुंबई : हॅलो प्रभात
अजित पवारांचे निधन झाल्यानंतर चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. पक्षाच्या मागणीनंतर सुनेत्रा यांना या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यातच राष्ट्रवादीच्या दोन गटातील विलीनीकरणाच्या चर्चेमुळे हा निर्णय आणखी कसोटीचा ठरला. शरद पवारांचा राष्ट्रवादी गट आणि उर्वरित पवार कुटुंबाला या निर्णयाबाबत विश्वासात घेतले नसल्याचा मुद्दाही समोर आला. या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातून कुणीही शपथविधीला उपस्थित राहिले नाही. मात्र आता शपथविधीनंतर अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट टाकून आपल्या काकींना शुभेच्छा दिल्या आहेत.
 
पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राकाकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. खरं म्हणजे मा.अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही पण किमान सुनेत्राकाकींच्या रुपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू. डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकूल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, हे कळत नाही..! 
Tags
To Top