ब्रेकिंग न्यूज... शपथ विधीनंतर खातेवाटप जाहीर ; सुनेत्रा पवारांकडे अर्थ खातं नाही !

Admin
शपथ विधीनंतर खातेवाटप जाहीर
सुनेत्रा पवारांकडे अर्थ खातं नाही !

मुंबई : हॅलो प्रभात
अजित पवारांच्या अकाली निधनानंतर निधनाच्या चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर खातेवाटपही जाहीर करण्यात आलं आहे.  दादांकडील अर्थ खाते वगळून अन्य खात्यांची धुरा सुनेत्रा पवारांकडे देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ खात्याची धुरा देण्यात आली आहे. अर्थ व नियोजन खातं मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे. 
 
अजित पवार यांच्याकडे असलेली तिन्ही खाती सुनेत्रा पवार यांच्याकडेच आहे. मात्र, अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहील. त्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प आता देवेंद्र फडणवीस मांडणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडील कोणती खाती ?
  •  राज्य उत्पादन शुल्क
  • क्रीडा व युवक कल्याण
  • अल्पसंख्याक विकास व औकाफ

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी आज (31जानेवारी) शपथ घेतली आहे. आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.


Tags
To Top