लोणी काळभोर–कदमवाकवस्ती–वडकी गटात कमळाची लाट

Admin
लोणी काळभोर–कदमवाकवस्ती–वडकी गटात कमळाची लाट

लोणी काळभोर : हॅलो प्रभात
केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असल्याने विकासकामांचा वेग वाढला असून नागरिकांचा कलही भाजपकडे झुकताना दिसत आहे. महानगरपालिकेतील यशानंतर आता लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व वडकी जिल्हा परिषद–पंचायत समिती गणांत ‘कमळाची लाट’ येत असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना, महिलांसाठी रोजगार, गाव-वाड्या वस्त्यांसाठी मोठा निधी, जलद गतीने रस्ते व मूलभूत सुविधा या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याने भाजपला मोठे बळ मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने या गटांत तुल्यबळ उमेदवार उभे करून निवडणुकीत जोरदार तयारी केली आहे.


लोणी काळभोर–वडकी जिल्हा परिषद गटातून पुनम बाबुराव गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली असून, गृहिणी म्हणून तसेच महिलांसाठी केलेल्या सामाजिक कामामुळे त्यांना परिसरात चांगला पाठिंबा मिळत आहे. लोणी काळभोर–वडकी पंचायत समिती गणातून वकील क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्वेता कमलेश काळभोर या उमेदवार आहेत. त्यांच्या पती कमलेश काळभोर यांनी सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात राबवलेल्या उपक्रमांमुळे हे सुशिक्षित कुटुंब परिसरात परिचित आहे.
कदमवाकवस्ती पंचायत समिती गटातून ज्ञानेश्वर नामुगडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिक्षक कुटुंबातील हे उमेदवार असून, त्यांच्या मातोश्री मंदाकिनी नामुगडे ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत, तर बंधू पंढरीनाथ नामुगडे हे पत्रकार आहेत. त्यामुळे या तिन्ही उमेदवारांचा परिसरात मोठा जनसंपर्क आहे.
उमेदवारी जाहीर होताच नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या गटांत भाजपने विरोधकांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ‘कमळ’ किती फुलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
To Top