![]() |
| पुण्यात भाजपचा बंडखोरांना झटका ! तब्बल 69 जणांचे निलंबन |
पुणे : हॅलो प्रभात
नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांची संख्या मोठी होती. तब्बल अडीच हजार भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्याला पक्षाचे तिकीट मिळावं अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले इनकमिंग आणि जागेच्या मर्यादेमुळे अनेकांना भाजपकडून तिकीट मिळाले नाही. त्यामुळे काही इच्छुक कार्यकर्त्यांनी पक्षाविरोधात बंडाचे निशाण फडकावत निवडणूक लढली तर काही कार्यकर्त्यांनी विरोधातील नेत्याला निवडणुकीमध्ये मदत केली. अशा कार्यकर्त्यांवर पक्षाने आता कारवाईच्या बडगा उगारला आहे. भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या 69 जणांची यादी तयार केली असून त्यांच्यावर तब्बल सहा वर्षांचे निलंबन करण्यात आले असल्याचे समोर आले आहे.
निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये शिवाजीनगर मतदारसंघातील 7 जणांचा समावेश आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील 6, कसबा विधानसभा मतदारसंघातून 6, हडपसर विधानसभा मतदारसंघातून 19, खडकवासला विधानसभा मतदारसंघातून 9, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून 8, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून 9 आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातून 4 अशा एकूण 69 जणांचा समावेश आहे.
यातील बहुतांशी जणानी पक्षाकडून हकालपट्टी होण्याच्या आधीच पक्षाला सोडचिट्टी दिली असल्याचे देखील सांगितले जात आहे. याबाबत शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निवडणूक लढविलेल्या कार्यकर्त्यांचे पुढील सहा वर्षाकरिता पार्टीमधून निलंबन करण्यात आले आहे. पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती न दाखवण्याचा निर्धार पक्षाने स्पष्ट केला आहे. दरम्यान, पक्षातील कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, अशा सूचनाही जिल्हाध्यक्षांनी केल्या आहेत. असं घाटे यांनी सांगितलं आहे.