![]() |
| कोल्हापूर परिक्षेत्रात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या सांगलीतील १९ जणांची जिल्ह्याबाहेर बदली |
सांगली : हॅलो प्रभात
कोल्हापूर परिक्षेत्रात पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यातील १९ पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या असून पाच अधिकाऱ्यांची जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दोन अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. या बदल्या प्रशासकीय कारणास्तव तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय आकाराम हारूगडे यांची सांगलीहून कोल्हापूर येथे, तर प्रदीप बाळासाहेब सूर्यवंशी यांची सांगलीहून सातारा येथे बदली करण्यात आली आहे.
सहायक पोलिस निरीक्षकांमध्ये मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे आण्णासाहेब वसुदेव गादेकर यांची पुणे ग्रामीण येथे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सिकंदर विष्णू वर्धन यांची सोलापूर ग्रामीण येथे, राजेश जोतिबा माने यांची सातारा येथे, तर अभिजित जयसिंग कुदळे यांची पुणे ग्रामीण येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलिस उपनिरीक्षकांपैकी तेजस्विनी रामचंद्र पाटील, इकबाल गुलाब महात, प्रियांका अभिजित खाडे, मृणालिनी कलगोंडा पाटील, संजीव भाऊसाहेब जाधव, राजू श्रीकांत अन्नछत्रे, श्रीकांत मोहन वासुदेव, प्रमोद प्रकाश खाडे व दीपक आनंद माने यांची कोल्हापूर जिल्ह्यात बदली झाली आहे. संदीप नामदेव गुरव, सागर मच्छिंद्र गायकवाड व केशव शंकर रणदिवे यांची सोलापूर ग्रामीण येथे, तर नीलम मदनराव जाधव यांची सातारा येथे बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक निभावरी नारायण रेळेकर यांची सोलापूर ग्रामीणहून सांगलीत, तसेच सरिता सोपान जाधव यांची साताऱ्यातून सांगलीत नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रणोती रघुनाथ यादव व पोपट विलास काशीद यांची सोलापूर ग्रामीणहून सांगलीत, तर प्रियांका दशरथ माने यांची पुणे ग्रामीणहून सांगलीत बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक रूपाली भाग्यवंत गायकवाड आणि जयश्री आबासाहेब कांबळे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. या बदल्यांमुळे जिल्ह्यातील पोलिस प्रशासनात काही प्रमाणात फेररचना होणार आहे.