लाडक्या बहीणींसाठी मोठी अपडेट ; ई-केवायसी दुरुस्तीची शेवटची संधी...

Admin
लाडक्या बहीणींसाठी मोठी अपडेट 
 ई-केवायसी दुरुस्तीची शेवटची संधी

मुंबई : हॅलो प्रभात
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी यापूर्वी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, या प्रक्रियेदरम्यान काही महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत राज्य सरकारने लाभार्थींना पुन्हा एकदा दुरुस्तीची संधी उपलब्ध करून दिली आहे.

आदिती तटकरे यांची पोस्ट

आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे सांगितले की, अनेक पात्र महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन पोर्टलद्वारे ई-केवायसी माहितीमध्ये सुधारणा करण्याची सुविधा 31 मार्च 2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ मिळावा, हीच महिला व बालविकास विभागाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Join Now

दरम्यान, 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना काही महिलांकडून ‘कुटुंबातील सदस्य सरकारी किंवा कंत्राटी कर्मचारी आहे का, तसेच निवृत्तीनंतर पेन्शन घेत आहे का’ या बाबतीत चुकीचा पर्याय निवडण्यात आल्याचे समोर आले होते. त्यामुळे या लाभार्थी महिलांसाठीच ई-केवायसी दुरुस्तीची ही विशेष संधी देण्यात आली आहे.ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडलेल्या महिलांनी निश्चित मुदतीपूर्वी माहिती दुरुस्त करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे हो वाचा :- उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा 

लाडक्या बहिणींना एकत्रित मिळणार एवढे रुपये... 

To Top