शिट्टी समोरील बटन दाबा ; लाडकी बहीण योजना २१०० करु : ना. हसन मुश्रीफ

Admin

अब्दुललाट : हॅलो प्रभात
लाडकी बहीण योजनेची रक्कम २१०० रुपये निश्चित करण्यात येणार असून येत्या सात तारखेला शिट्टी या चिन्हासमोर खटाखट बटन दाबून राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळाले असून घराघरात दिलासा पोहोचला आहे. २१०० रुपये थेट खात्यावर जमा होणार असल्याने महिलांची आर्थिक ताकद वाढणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधूनच पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधांसाठी निधी आणला जातो.विकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून ती गतीने पुढे नेण्यासाठी सक्षम, काम करणारे प्रतिनिधी आवश्यक आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत शिट्टी चिन्हासमोरील बटण दाबून राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या नक्कीच शिरोळ तालुक्याचा यापुढे देखील सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी व या तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर कटिबद्ध राहू,असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
 
अब्दुललाट येथे जिल्हा परिषदेचे उमेदवार श्रद्धा गायकवाड, पंचायत समितीचे उमेदवार मिलिंद कुरणे व नाना उपाध्ये यांच्या प्रचारार्थ आयोजित जंगी जाहीर सभेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले, शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या पाचही घटकांवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भर दिला आहे. माझ्या पावलावर पाऊल ठेवून ते काम करीत आहेत. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना, अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण, शाळांचा दर्जा सुधारणा, आरोग्य सेवा बळकट करणे शिरोळ तालुक्यातील शेतकरी, युवक, महिला व वंचित घटकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यावर शिरोळ तालुक्यात भर देण्यात आला आहे.
तालुक्याचा वेगवान विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असून, काम करणारे व जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारे प्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे. राजर्षी शाहू विकास आघाडीचे सर्वच उमेदवार हे सर्वसामान्य आणि सर्व जाती-धर्माचे आहेत. त्यामुळे त्यांना निवडून दिल्यास नक्कीच या मतदार संघाचा विकास साधला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण आणि दीर्घकालीन विकास हेच आपले ध्येय असून त्यासाठी आरोग्य, शेती, पाणीपुरवठा, रस्ते, उद्योग आणि रोजगारनिर्मिती या सर्वच क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. तालुक्यात गट–पक्ष–जात न पाहता केवळ जनतेच्या गरजा ओळखून आतापर्यंत दोन ते अडीच हजार कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. आरोग्य क्षेत्रात ९० बेडवरून ९०० बेडपर्यंत रुग्णालय सुविधा वाढवण्यात आल्या असून मानसिक आरोग्य रुग्णालय, अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालये आणि नवीन हॉस्पिटल्स उभारले जात आहेत.
क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी 80 टक्के अनुदान, एमआयडीसी, गारमेंट पार्क, महिलांसाठी रोजगार, ३७ गावांची नळ पाणीपुरवठा योजना, सोलर फिल्टर, ४५० किलोमीटर पाणंद रस्ते, क्रीडा संकुलासाठी ३२ कोटींचा प्रस्ताव आणि १ हजार कोटींचा कन्यागतपर्व निधीच्या माध्यमातून तालुक्याचा कायापालट केला जाईल.
ही विकासाची गती कायम ठेवण्यासाठी येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन आमदार यड्रावकर यांनी केले.

Join Now

याप्रसंगी पंचायत समितीचे उमेदवार मिलिंद कुरणे यांच्या निवडणूक खर्चासाठी ग्रामस्थांच्या वतीने १० हजार रुपयाची देणगी या सभेत देण्यात आली. याप्रसंगी कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनिषा डांगे, संजय परीट, संजय कोळी, किरण कुरणे, प्रशांत आवळे, लक्ष्मण पाटील, सागर सांगावे, सौरभ कांबळे, अरुण पाटील, देवेंद्र कांबळे, संजय परीट यांची मनोगते झाली.

राजर्षी शाहू विकास आघाडीने सर्वसामान्य व गरीब कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिल्याबद्दल अब्दुललाट येथील ग्रामस्थांनी पंचायत समितीचे उमेदवार मिलिंद कुरणे यांना पाठिंबा दिला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने १० हजार रुपयांचा निवडणूक निधी तुकाराम पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. राजर्षी शाहू विकास आघाडी ही सर्वसमावेशक व लोकाभिमुख आघाडी असून सामान्य कार्यकर्त्यालाही नेतृत्वाची संधी देण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. मिलिंद कुरणे यांनी दिलेल्या या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, निवडून आल्यास सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

या सभेस अमरसिंह पाटील, रणजित पाटील, सरपंच कस्तुरी कुरुंदवाडे, मल्लापा खोत, जयश्री आवळे, देवेंद्र कांबळे, वृषभ कोळी, विद्याधर कुलकर्णी, तुकाराम पाटील, शामणअप्पा चौगुले, संजय पाटील, दादासो सांगावे, संजय खूरपे, एस.के.पाटील, रावसाहेब पाटील, शामगोंडा पाटील, स्वप्नील सांगावे, जितू पाटील, सुरेश बेडक्याळे, सुरेश देवमोरे, पांडुरंग खोत, अक्षय आलासे यांच्यासह राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Tags
To Top