| २०२२ मध्येच 'शरद पवार' एनडीएत येणार होते बड्या नेत्याचा दावा |
मुंबई : हॅलो प्रभात
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. २९ जानेवारी रोजी राज्यभरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी शरद पवार हे २०२२ मध्येच एनडीएत सहभागी होण्याच्या तयारीत होते, असा दावा केल्याने राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नेते प्रफुल पटेल यांनी या चर्चांचे खंडन केले आहे. अजित पवार यांची भूमिका एनडीएबरोबर राहण्याची होती, तसेच महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र यावे, अशी त्यांची इच्छा होती, असे या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. २९ जानेवारी रोजी राज्यभरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी शरद पवार हे २०२२ मध्येच एनडीएत सहभागी होण्याच्या तयारीत होते, असा दावा केल्याने राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे.
दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांनी शरद पवार यांच्याबाबत महत्त्वाचा दावा केला आहे. २०२२ मध्ये शरद पवार यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले होते. कोणती खाती घ्यायची आणि कोणती नको याबाबतही चर्चा झाली होती, असे शिरसाट यांनी म्हटले आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या चर्चा झाल्या की नाहीत, याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात शरद पवार यांनी अधिकृत भूमिका मांडल्याशिवाय यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी महायुतीत सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यावेळी शरद पवार यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हावे, असे वक्तव्यही त्यांनी केले होते. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात सामना झाला होता. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला. तसेच, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार बारामतीतून पुन्हा आमदार म्हणून निवडून आले होते.
![]() |
| Join Now |
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू असतानाच संजय शिरसाट यांच्या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर शरद पवार यांची प्रतिक्रिया काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.