पुतळा विटंबनेप्रकरणी दांपत्यास अटक

Admin

सांगली : डिजिटल हॅलो प्रभात 

शहरातील एका पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दांपत्यास अटक केली. संशयीत आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्तींनी दोघांना दि. २ फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दोन दिवसांपूर्वी शहरातील एका पुतळ्याची विटंबना झाल्याचे निदर्शनास आले होते. संबंधितांनी पुतळ्यावर रेड ऑक्साईड आणि ॲल्युमिनिअम कलर टाकला होता. 

पोलिसांनी तांत्रिक दृष्टया तपास करुन ७२ तासांनी एका दांपत्यास अटक केली. या कारवाईत पोलीस निरिक्षक कल्लाप्पा पुजारी आणि सतीश शिंदे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.  

To Top