पी.एम.किसान योजनेचा हप्ता न मिळाल्याने लाभार्थी शेतकरी संतप्त

Admin

जत :  डिजिटल हॅलो प्रभात

    जत तालुक्यातील पी.एम.किसान योजनेचा १३ वा हप्ता न मिळाल्याने लाभार्थी शेतकरी संतप्त, महसुल खाते व कृषी खाते यांच्यात श्रेय घेण्यावरुन सुरु असलेल्या संघर्षांत लाभार्थी शेतकऱ्यांची फरफट होत आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की,पी.एम.किसान योजनेंतर्गत पाच वर्षाच्या आतील शेतकऱ्यांला वर्षाला चार हजार रुपये त्यांच्या बॅक खात्यावर जमा केले जाते. प्रत्येक तहसीलदार कार्यालयात पि.एम.किसान योजनेसाठी स्वतंत्र विभाग आहे.या विभागाकडून लाभार्थी यांना मदत केली जाते.परंतु मध्यंतरी के.वाय.सी.च्या नावाखाली पी.एम.किसान योजनेचा हप्ता जमा करताना लाभार्थ्यांची अडवणूक करणे,के.वाय.सी.करुनही हप्ता अडविणे असे प्रकार सुरु होते.

    तालुक्यातील डफळापूर येथिल लाभार्थी शेतकरी याला पी.एम.किसान योजनेचा १३ वा हप्ता न मिळाल्याने त्याने जत तहसिलदार कार्यालयात जाऊन सबंधित विभागाकडे चौकशी केली असता सबंधित विभागाकडून सांगण्यात आले की, पी.एम.किसान योजनेचे काम आमच्याकडे नाही.तुम्ही या बाबतीत कृषी खात्याकडे चौकशी करा.पी.एम.किसान योजनेचे काम आमच्याकडून काढले आहे व ते कृषी खात्याकडे दिले आहे.तुम्ही त्यांच्याकडे चौकशी करा म्हणुन महसुल खात्याने आपली जबाबदारी झटकून टाकली.

    जत तहसीलदार कार्यालय व कृषी कार्यालय या दोघांमध्ये पुरस्कारावरुन वाद पेटला आहे. जत तहसिलदार कार्यालयातील पी.एम.किसान योजना विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी पी.एम.किसान योजनेचे काम चांगल्याप्रकारे व उल्लेखनिय असे करुनही चांगल्या कामाचा पुरस्कार मात्र कृषी विभागाला मिळाल्यामुळे तहसिलदार कार्यालयातील सबंधित विभागाचे अधिकारी नाराज झाले असून याचा फटका पी.एम.किसान योजनेच्या लाभार्थ्यांना बसत आहे त्यामुळे लाभार्थ्यांना योजनेच्या १३ व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागत आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी सांगली यांनी लक्ष घालून लाभार्थ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

To Top