जगाला दिशा दाखवणारे खरे कार्य काडसिद्धेश्वर स्वामीचे : श्री श्री रवी शंकरजी

Admin

 


कोल्हापूर  :   डिजिटल हॅलो प्रभात 

आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख श्री श्री रवीशंकरजी यांनी सिद्धगिरी मठ येथे भेट देऊन आगामी सुमंगलम उत्सवाच्या तयारीची पाहणी करून या भव्य उत्सावाचे कौतुक केले."सुमंगलम महोत्सव भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा आणि पर्यावरण प्रबोधन करणारा महोत्सव आहे. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना सोबत घेऊन पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी जे काम करत आहेत ते प्रेरणादायी आहे"असे कौतुकोदगार आर्ट ऑफ लिविंग चे संस्थापक आणि अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकरजी यांनी काढले. कणेरी मठ येथे २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत सुमंगलम महापंचभूत महोत्सव होत आहे‌. या महोत्सवाची सध्या कणेरी मठ परिसरात तयारी सुरू आहे. श्री श्री रविशंकरजी हे ३१ जानेवारी व एक फेब्रुवारी असे दोन दिवस कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी कनेरी मठ परिसरात भेट दिली.सुमंगलम महोत्सव स्थळाची पाहणी केली. पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी यांनी सुमंगलम महोत्सवसंबंधी माहिती दिली. तसेच श्री श्री रविशंकरजी यांना महोत्सव कालावधीत सहभागी होण्याची विनंती केली. तसेच सुमंगलम महोत्सव परिसरात सध्या सुरू असलेल्या विविध कामांची माहिती दिली. याप्रसंगी बोलताना श्री श्री रविशंकरजी त्याने बुद्धिस्ट्री कार्ड सिद्धेश्वर स्वामी यांच्या पुढाकारातून होत असलेले शुभ मंगलम पंचमहाभूत महोत्सव भारतीय संस्कृती अध्यात्म पर्यावरण अशा विविध घटकांचे घडवणारे आहे. पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी यांचे कार्य साऱ्यांनाच प्रेरणादायी आहे.

Advertisement


To Top