कवठेमहांकाळ : डिजिटल हॅलो प्रभात
शहरात मंगळवार दि. ३१ जानेवारी रोजी तासगाव कवठेमहांकाळच्या लोकप्रिय आमदार सुमनताई आर.आर.(आबा) पाटील,युवानेतृत्व रोहितदादा पाटील,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेशभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कार्यालयात लक्ष्मी बल्लारी यांच्या कलास्पर्श अकॅडमीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कला म्हणजे स्वतःचा शोध घेण्याचं एक साधन आहे.विविध कला-कौशल्य शिकून आपण आपल्या आयुष्याला अधिक समृध्द करू शकतो तसेच स्वतःची एक नवीन ओळख सुद्धा निर्माण करू शकतो आणि म्हणूनच सौ.लक्ष्मी बल्लारी यांच्या कलास्पर्श अकॅडमीद्वारे रांगोळी,मेहंदी,चित्रकला या अंगभूत गुणांना वाव देण्यासाठी तसेच हे गुण विकसित होण्यासाठी कवठे महांकाळमध्ये ग्रामीण भागातील तरुणींसाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे.
या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी कवठे महांकाळ महिला राष्ट्रवादी आघाडीच्या शहराध्यक्षा मीनाक्षी माने,डॉ.हर्षला कदम,बबुताई वाघमारे,नूतन वाघमारे,प्राजक्ता बोगार,राजश्री माळी,दीपा जाधव,लक्ष्मीबाई बल्लारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
ADVT |