उत्तम आरोग्य हीच धनसंपदा : डॉ. विजयसिंह पाटील

Admin

पाटण : डिजिटल हॅलो प्रभात (चंद्रकांत सुतार)
सध्याच्या धावपळीच्या जगात आपण किती पैसा, संपत्ती साठवतो यापेक्षा आपण आपले आरोग्य किती चांगले राखतो यावरती आपली संपत्ती अवलंबून आहे. आरोगउत्तम असेल तरचं आपण धनवान आणि खरे श्रीमंत आहोत. भरपूर संपत्ती आहे परंतु त्याचा उपभोग घेऊ शकत नसेल तर ती संपत्ती काही उपयोगाची नाही. रुग्णांची न थकता, मनापासून सेवा करणं हा प्रत्येक डाँक्टर चा धर्म आहे
आणि तो निभवणे आपलं काम आहे असं मत सुप्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉ. विजयसिंह पाटील यांनी व्यक्त केले. 
डाँ.पाटील यांनी, सध्या फास्टफूड चा जमाना आहे. रोजच्या धावपळीच्या युगात जेवन खाणे यांच्या कडे दुर्लक्ष होत आहे. परंतु आरोग्यासाठी आपण वेळ काढला पाहिजे. माणसाचे ह्रदय तंदुरुस्त असेल तर माणूस एखाद्या राजापेक्षा ही कमी नाही. आपण किरकोळ दुखण्यावरती दुर्लक्ष करतो आणि त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणात भोगावे लागतात. आपल्या शरीराची आपण योग्य काळजी घेणं गरजेचे आहे. वर्षातून किंवा दोन वर्षातून आपण आपली आरोग्य तपासणी करणं गरजेचं आहे. आजच्या शिबीरामध्ये आपण अनेक आजारांवरती तपासणी, सल्ला, योग्य मार्गदर्शन आणि मोफत औषध वितरण करणार आहोत. लोकांनी वेळोवेळी आरोग्य सल्ला घेणं आणि आपल्याला नेमकं काय होतं याची तपासणी करून घेणं महत्त्वाचे आहे असं सांगितले. 
यावेळी राजाभाऊ काळे, डाँ. विजय साठे, डाँ. अजय परीट, डाँ. नितिन गायकवाड, संदीप देसाई, नगरसेवक उमेश टोळे, स्वप्निल माने, नगरसेविका शैलजा पाटील, सुषमा मोरे, संजना जवारी,
मिनाज मोकाशी, संजिवनी जगताप, सोनम फुटाणे, आस्मा इनामदार, अनिता देवकांत यांची उपस्थिती होती. 


To Top