दीड तास मोबाईल बंद ; हजारो पालक विद्यार्थ्यांचा निर्धार

Admin

विद्यार्थी हिताचा हा उपक्रम काळाची गरज : वडगावचा उपक्रम जिल्हाभर राबविणार

 पेठवडगाव:  डिजिटल हॅलो प्रभात (रुपाली सूर्यवंशी) 
मोबाईल टीव्हीच्या आहारी गेलेल्या आजच्या पिढीला यातून बाहेर काढण्यासाठी व मुलांच्या अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत स्तुत्य आणि आवश्अयक असा सायंकाळी सात ते साडेआठ वाजेपर्यंत मोबाईल व टीव्ही बंद उपक्रम पेठ वडगाव शहरात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला  हजारो पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. माजी नगराध्यक्षा व कल्याणी सखी मंचच्या अध्यक्षा विद्याताई पोळ यांनी पेठ वडगाव शहराचा आम्ही वडगावकर म्हणून राबविलेला दीड तास मोबाईल बंद उपक्रम जिल्हाभरात राबवू असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केले. यावेळी हजारो विद्यार्थी पालकांनी उपस्थित राहून दीड तास मोबाईल बंद ठेवण्याचा संकल्प केला.
पेठ वडगाव येथे शिवजयंती दिनी शहरात सुरु करण्यात आलेल्या दीड तास मोबाईल बंद

 उपक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.  या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित आम. 

जयंत आसगावकर, आम. राजूबाबा आवळे, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, माजी पोलीस 

आयुक्त गुलाबराव पोळ, माजी नगराध्यक्षा विजयादेवी यादव,पोलीस निरीक्षक भैरव 

तळेकर, मुख्याधिकारी सुमित जाधव आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिक्षणाधिकारी आंबोकर म्हणाले, श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळाच्या 

सचिव विद्याताई पोळ यांनी विद्यार्थ्यांच्या तसेच घराघरातील ज्वलंत बनलेल्या या 

प्रश्नाबाबत विधायक व अत्यंत स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम विद्यार्थी व 

पालकांसाठी अत्यंत महत्वाचा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  

माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ म्हणाल्या, शिक्षण संस्थेची सचिव म्हणून विद्यार्थ्यांच्या 

शैक्षणिक प्रगतीचे निरीक्षण करताना या मोबाईलच्या भस्मासुरामुळे किती दुष्परिणाम होत 

आहेत, विद्यार्थ्यांचे किती नुकसान होत आहे याची माहिती घेतली. घरात सुरु रहात असलेला 

टीव्ही आणि मुलांचा मोबाईलचा अतिवापर यामुळे भावी पिढीचे प्रचंड नुकसान होत 

असल्याचे दिसून आले.  यातूनच वडगाव शहरात दीड तास मोबाईल बंद उपक्रम राबविण्याची 

संकल्पना राबविण्याचा निर्धार केला. 

यावेळी वारणा दुध संघाचे संचालक डॉ.मिलिंद हिरवे, माजी नगरसेवक सुनिल हुकेरी,  राजकुमार पोळ, गुरुप्रसाद यादव, शिवाजीराव आवळे, संदीप पाटील, राजू देवस्थळी, विजुभाई शहा, अभिजीत गायकवाड, अमोल हुकेरी, जवाहर सलगर, सचिन चव्हाण, मिलिंद सनदी, माजी नगराध्यक्ष अभिजीत पोळ,माजी नगराध्यक्षा लता सूर्यवंशी, माजी नगरसेविका उर्मिला उंडाळे, यांच्यासह वडगाव शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. To Top