विटा (डिजिटल हॅलो प्रभात) :
विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेजमध्ये प्रथमच कला महोत्सव साजरा करण्यात आला. कलाशिक्षक सतिशकुमार माने यांनी प्राचार्य संजय साठे यांच्या मार्गद्शनाखाली कलामहोत्सवाचे संयोजन केले.नामवंत कलाकार आणि चित्रकार राजा ठोके यांनी स्मरणचित्र,शशिकांत अलदर यांनी कलाशिक्षक यांचे व्यंगचित्र रेखाटले.
चित्रकार अक्षय भंडारे यांनी स्थिरचित्र,चित्रकार सागर कांबळे यांनी रांगोळी आणि चित्रकार स्वप्नील निकम यांनी व्यक्तिचित्रण याविषयी प्रात्यक्षीक देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विभावरी फिरमे,केतकी माने,अनुष्का सलगर,गौरी माने,श्रेया पाटील,तनिष्का जाविर,ज्ञानेश्वरी जावीर आणि राजनंदिनी या विद्यार्थीनींनी गाणी सादर केली.शहरातील प्रख्यात चित्रकार,म. गांधी विद्यामंदिरचे कलाशिक्षक राजेंद्र ठोके यांना डी. लिट पदवी प्राप्त झाले बद्दल सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय साठे होते.प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्था दक्षिण विभागाचे अध्यक्ष माधवराव मोहिते होते.यावेळी उपमुख्याध्यापक संजीवकुमार कुंभार,पर्यवेक्षक विजय पवार,देशमुख एस. एस.,खरसुंडी विद्यालयाचे कलाशिक्षक दिपक रणदिवे,वेजेगाव कलाशिक्षक शिकलगार सर,गार्डी-घानवड कलाशिक्षक संगम घाडगे,कोव्हिड योद्धा सीराजभाई शिकलगार आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन सीमंतिनी पाटील,नम्रता म्हैत्रे व देविदास जाधव यांनी केले.