जोतिबा डोंगरावर कर्मचाऱ्यांच्याकडून भाविकाला मारहाण...पहा व्हिडीओ

Admin
 देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांनी भाविकाला केली मारहाण

पन्हाळा : डिजिटल हॅलो प्रभात (किरण मस्कर )

    पन्हाळा तालुक्यातील जोतिबा डोंगर येथे मंदिरामध्ये एका भाविकाला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे भाविक आणि पुजारी वर्गातून या मारहाणीबद्दल संतप्त भावना व्यक्त होत आहेत. दि.५ रोजी झालेल्या पौर्णिमेनिमित्त भाविकांनी जोतिबा मंदिरामध्ये भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीत एका भाविकाने जोतिबा मंदिरात बैल आणले होते. 


यामुळे देवस्थान समितीचा एक कर्मचारी आणि त्या भविकामध्ये वाद झाला आणि या वादाचे हाणामारीत रूपांतर झाले. या ठिकाणी देवस्थान समितीचे इतर कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक जमा झाले आणि त्या भाविकाला बेदम मारहाण केल्याचा माहिती काही प्रत्यक्षदर्शी भाविकांनी दिली. त्यातीलच एका भाविकाने हा हणामारीचा व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे. एका भाविकाला केलेल्या या मारहाणीबद्दल भाविक आणि पुजारी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे
.To Top