अभ्यासात सातत्य ठेवल्यास तुम्हाला कोणीही यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही : माजी राज्य मंत्री शिवाजीराव नाईक

Admin

 


शिराळा :  डिजिटल हॅलो प्रभात

मानकरवाडी (ता.शिराळा) येथील सौ. राजश्री म्होप्रेकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार समारंभात ते बोलत होते. माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, सम्राट महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना शिवाजीराव नाईक म्हणाले, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी होण्यात तालुका आघाडीवर आहे. ग्रामीण भागातील युवक युवती यश संपादन करत आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवावी. काही वेळा अपयश आले तरी देखील आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळते. पालकांनी देखील अशा विद्यार्थ्यांना पाठिंबा देणे गरजेचे आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य के. डी. पाटील, यशवंत ग्लुकोजचे संचालक प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते न्यायाधिश सौ. राजश्री म्होप्रेकर, आंतरराष्ट्रीय उद्योजिका सौ. राजश्री काळे, कुस्ती भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल पै. वसंतराव पाटील, नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी प्रताप चव्हाण, नारायण कुंभार, प्रकाश पाटील, विलास चौगुले, राजेश चव्हाण, तानाजी महिंद, सूरेशशेठ म्होप्रेकर, जनार्दन म्होप्रेकर, निवृत्त कॅप्टन रामचंद्र मानकर यांच्यासह अन्य मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार भीमराव पाटील यांनी मानले.


Tags
To Top