साई पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रणव हारुगडे बिनविरोध

Admin

नूतन चेअरमन-संचालक सत्कार संपन्न 

 

विटा : डिजिटल हॅलो प्रभात 

येथील साई नागरी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाली असून चेअरमन पदी प्रणव शिवाजी हारुगडे व व्हा. चेअरमन पदी उदय प्रकाश शहा यांची बिनविरोध निवड झाली. तज्ञ संचालक अमृत चंद्रकांत कुलकर्णी व सल्लागार आशिष अमर लोटके यांचीही निवड करण्यात आली.नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते अॅड. महेश शानभाग यांच्या हस्ते व विटा मर्चंट बँकेचे व्हा. चेअरमन उत्तम चोथे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.साई नागरी पतसंस्थेचे संस्थापक दिलीप आमने प्रास्ताविकात म्हणाले, संस्थेची स्थापना १९९७ मध्ये झाली व पाच टर्म पूर्ण केल्या. सभासदांच्या विश्वासावर संस्थेचे कामकाज उत्तम रित्या सुरू आहे . 

१९५० सभासद,७१ लाख वसूल भाग भांडवल,१२ कोटी ४१ लाख ठेवी,९ कोटी १५ लाख कर्ज वाटप,चार कोटी ४९ लाख बँक गुंतवणूक,खेळते भाग भांडवल १८ कोटी ५० लाख अशी सांपत्तीक स्थिती आहे.अद्यावत सेवा पुरवण्यासाठी साई पतसंस्था प्रयत्न करत आहे."उत्तमराव चोथे म्हणाले, "संस्थेबद्दल आस्था असणारे मोठ्या प्रमाणावर आहेत. या संस्थेत आमने साहेब व संचालकांनी राजकारण आणले नाही.दिलीप आमने यांनी संस्थेचे कामकाज उंचीवर नेली आहे, ते संचालक मंडळाने अधिक उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करावा.संस्थेची भरभराट होण्यासाठी प्रयत्न करावा." ऍड.महेश शानबाग म्हणाले,"चांगले कर्जदार मिळणे ही सध्या अवघड गोष्ट आहे.मोबाईल ॲप्स वापर, डिजिटल पेमेंट व अन्य अद्यावत सेवा-सुविधा साई पतसंस्थेने सुरू कराव्यात.प्रतिकूल परिस्थितीत पतसंस्थेने केलेली वाटचाल कौतुकास्पद आहे.आमने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साई पतसंस्था प्रगतीपथावर राहील." 

प्रणव हारगुडे,उदय शहा,अमृत कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नेचर केअर फर्टीलायझरचे संस्थापक जयंत बर्वे,पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन अँड विनोद गोसावी,विनय पेठकर, डॉ. नागराळे,महेश किर्दत,सुलोचना चोथे,सौ.खारगे,अशोक भिंगारदेवे, अमर लोटके,दत्तात्रय तारळकर आदी मान्यवर व सभासद उपस्थित होते. प्रदीप जोशी यांनी मान्यवरांचे स्वागत व सूत्रसंचालन केले.सेक्रेटरी कविता जोग यांनी आभार मानले.To Top