"नांद्रे येथे होणारा गौतमी पाटीलचा कार्यक्रम उधळून लावू" : प्रशांत सदामते

Admin

सांगली : डिजिटल हॅलो प्रभात 

स्वयंघोषित लावणी सम्राटणी गौतमी पाटील यांचा कार्यक्रम  सांगली जिल्ह्यात नांद्रे या गावी गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी होत असून, सदर कार्यक्रम राष्ट्र विकास सेना उधळून लावणार असा इशारा राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी दिला. 

निर्माण होणाऱ्या परिस्थितीस संयोजक व स्थानिक प्रशासन जबाबदार राहील.गौतमी पाटील यांच्या अश्लील डान्स मुळ महाराष्ट्रात कार्यक्रमावर कायमस्वरूपी बंदी घालावी. तसेच मिरज तालुक्यातील बेडग या गावी तिच्या कार्यक्रमादरम्यान जो मृतदेह आढळला त्या अनुषंगाने गौतमी पाटील वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची, सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कडे मागणी केली असता गेली दीड महिना झाला मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडून गौतमी पाटील यांची कोणतीही चौकशी अथवा कारवाई झाली नाही.

पोलिसांच्या आश्रयाने गौतमी पाटील यांचा लावणीच्या नावाखाली सांगली जिल्ह्यात गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी नांद्रे या गावी अश्लील डान्स होत आहे.  त्यामुळे राष्ट्र विकास सेनेकडून सदर होत असलेला कार्यक्रम उधळून लावण्यात येणार असून, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडून अद्याप कोणताही कारवाई न झाल्याने दि. 9 फेब्रुवारी सकाळी 11 वाजले पासून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर राष्ट्र विकास सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. असा इशारा राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी दिलाTo Top