गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस दलाला सूचना : सुनील फुलारी

Admin

  सांगली  : डिजिटल हॅलो प्रभात 
सांगली जिल्हा पोलीस दलाचे गुन्हे उघडकीस आणण्याचे काम समाधानकारक आहे. जिल्ह्यातील पोलिस दल आणखी सशक्त करण्यावर भर देण्यात येईल, अशी ग्वाही  कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बुधवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर अधीक्षक आँचल दलाल यांची प्रमुख उपस्थितीत फुलारी यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

काय म्हणाले फुलारी : शेअर मार्केटसह आर्थिक फसवणूक आणि गुन्हेगारी रोखण्यासाठीच्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही  आज दिल्या आहेत.  काही दिवसांतील गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे समाधानकारक काम आहे. बेसिक पोलिसींगवर भर देण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिस आणि जनतेसोबतची वर्तवणूक याबाबतही चर्चा झाली. आगामी सण, उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्ताच्या सूचनाही देण्यात आल्या. गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मोकासह वाळू तस्करांवर तडीपारीसह कारवाईच्या प्रस्ताव तयार केले आहे. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.

शेअर  मार्केट आर्थिक फसवणूकी बाबत : शेअर  मार्केटसह आर्थिक फसवणूकीच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहे. सांगली जिल्ह्यातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील पसार आरोपींचा शोध घेवून कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फसवणूक करणाऱ्यांकडून मालमत्ता जप्तीबाबत संबंधित तपास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. तसेच सायबर गुन्ह्यांबाबत जानजागृती व्हावी, यासाठी ठोस कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. गुन्ह्यातील मुद्देमाल फिर्यादींना परत देण्याच्या कायदेशीर बाबीही आधिकाऱ्यांना सांगण्यात आल्या आहेत.’’

पोलिसांच्या घरांचाआराखडा तयार : गेल्या काही दिवसांपासून सांगलीतील पोलिस चांगल्या घरांपासून वंचित आहेत. त्याअनुषंगाने श्री. फुलारी यांना विचारले असता ते म्हणाले,‘‘पोलिस वसाहतीचा आराखडा तयार आहे. कोरोनाच्या काळात हे काम रखडले. प्रत्यक्षात इस्लामपूर, जत आणि विश्रामबाग परिसरातील वसाहतींचा आराखडा तयार आहेत. ३८७ घरे पोलिसांना देण्यात येणार आहेत. प्रत्येकाला २बीएचके प्लॉट दिले जातील.’’

महामार्गांवर बेदकार वाहतूक :  जिल्ह्याच्या विकासात महामार्गांचा मोठा समावेश असतो. सांगली जिल्ह्यातून चार महामार्ग गेले आहेत. सुसज्ज असे महामार्ग असले तरी तेथे बेदकार वाहतूक आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेकांचे जीव गेले आहेत. यासह शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्याचेही फुलारी म्हणाले.


To Top