सरडे-निरावागज डांबरी रस्त्याचे रखडलेले काम पुन्हा सुरू

Admin
फलटण : डिजिटल हॅलो प्रभात 
येथील सरडे-सरडे नीरावागज रस्त्याचे काम गेले कित्येक दिवस रखडवले होते. सदरचा रस्ता सरडे खुदबक्षी पासून काही आंतरावर डांबरीकरन करण्यात आले होते. या पुढे निरवागज गावाला जोडण्यापासून काही अंतर राहिले असता अचानक रस्ता बंद केला, या रोडवर काही शेतकरी लोकांच्या शेती च्या अडचणी असल्या कारणामुळे या रस्त्याचे काम  रखडले पण काही सामाजिक राजकीय लोकांच्या माध्यमातून या शेतकर्‍यांच्या अडचणी सोडवत, नागरिकांसाठी चांगल्या प्रकारचा रस्ता व्हावा याकरिता काही शेतकरी लोकांच्या अडचणीचे प्रश्न मार्गी लावून पुन्हा रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. राजाळे-सरडे-नीरावागज हा रस्ता मुख्य असा आहे. या रस्त्यावरून कित्येक कामगार वर्ग बारामती या ठिकाणी कामासाठी जात असतात पाऊस पडला की पूर्ण रस्ता चीखलमय होतो . त्यामुळे  येथील लोकांना कामावर  जाण्यासाठी खूप कसरत करावी लागत होती.  त्यामुळे यारोड वरून जाणारा कामगार वर्ग निराश होत होता, आता पुन्हा सरडे निरवागज रस्त्याचे काम चालू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण झालेले पाहायला मिळत आहे.


To Top