जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानच्या माध्यमातून ७०० मोतिबिंदू शस्त्रक्रिया पूर्ण

Admin

इस्लामपूर येथे मोतीबिंदू शस्त्रक्रियेस मिरजेला पाठविणाऱ्या नेत्र रुग्णांना निरोप देताना प्रा.शामराव पाटील, अभियानचे इलियास पिरजादे,विनायक मुळीक,राजाराम जाधव,अनिल जाधव, विनायक जगताप,प्रसाद शेळके.

इस्लामपूर : डिजिटल हॅलो प्रभात 

आ.जयंतराव पाटील, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शना खाली जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानच्या माध्यमातून मिरज येथील लायन्स नॅब आय हॉस्पिटलमध्ये गेल्या ९ महिन्यापासून वाळवा तालुक्यातील मोतिबिंदू रुग्णांच्यावर मोफत शस्त्रक्रिया केल्या जात असून या मोतिबिंदू शस्त्रक्रिया पूर्ण झालेल्या रुग्णांचा आकडा ७०० च्यावर गेला आहे. मोतिबिंदू शस्त्रक्रिया करून आलेल्या रुग्णांनी अभियान व लायन्सला धन्यवाद देत समाधान व्यक्त केले. मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्याची गरज असणाऱ्या रुग्णांनी आमचे विभागीय संघटक किंवा राजारामनगर येथील कार्यालयाशी संपर्क करावा,असे आवाहन अभियानचे समन्वयक इलियास पिरजादे यांनी केले.
      इस्लामपूर येथील राजारामबापू ज्ञान प्रबोधिनी येथून मोतिबिंदू रुग्णांची ३१ वी बॅच मिरजेला पाठविण्यात आली. यामध्ये आष्टा, तुजारपूर,साखराळे,गोटखिंडी,रेठरेहरणाक्ष, कापुसखेड,कुंडलवाडी आदी गावातील रुग्णांचा समावेश आहे. राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील यांनी रुग्णांना निरोप दिला. अभियानचे समन्वयक इलियास पिरजादे,संघटक राजाराम जाधव, अनिल जाधव,विनायक मुळीक,शशिकांत वायदंडे,विनायक जगताप, प्रसाद शेळके, जालिंदर पाटील,दीपक चव्हाण,श्रीरंग नाईक, किरण खोत,इम्तियाज पिरजादे उपस्थित होते.
      श्री.पिरजादे म्हणाले,मोतिबिंदू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोतिबिंदूची  शत्रक्रिया करण्यास ७ हजारांपासून ५० हजारापर्यंत खर्च येतो. हा खर्च सर्वच कुटुंबां ना शक्य नाही. म्हणून आम्ही १ जून महिन्या पासून मिरज येथील लायन्स नॅब आय हॉस्पिटल या सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवित आहोत. पूर्वी दर शनिवारी २५-३० रुग्णांची बॅच मिरजेला पाठवित होतो. आता दर रविवारी रुग्ण मिरजेला पाठवीत आहोत. राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी येथून सकाळी १० वाजता रुग्णांना मिरजेला पाठविले जाते. तेथे रक्त,लघवी व रक्तदाब तपासणी करून शस्त्रक्रिया केली जाते. रुग्णांची दोन दिवस राहणे,नास्ता,जेवण आदी व्यवस्था केली जाते. रुग्णांनी आधार कार्ड, रेशन कार्ड,काही कपडे,तसेच रक्तदाब, मधु मेहाचा त्रास असल्यास त्याचा तपशील आणावा लागतो.
     अभियानचे संघटक मुरली जाधव,ओंकार चव्हाण,सचिन मुळीक,सौ.उज्ज्वला पाटील, विकास कुलकर्णी,सुरेंद्र बांदल,सुभाषराव साळुंखे हेही हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.


 

To Top