जनता सरकारला मतदानातून विरोध करायला उत्सुक आहे : आ.जयंत पाटील

Admin

 

इस्लामपूर : डिजिटल हॅलो प्रभात 
महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक आज मुंबई येथे संपन्न झाली. त्यास उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन केले. राज्यभर आपण सभांचे आयोजन केले आहे. या सर्व सभा यशस्वी व्हाव्यात यासाठी सर्वच घटक पक्षांनी झोकून देऊन काम करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी केले. 
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, सत्ता पालट होताना राज्यपाल महोदयांनी कसा हस्तक्षेप केला हे आता पुढे येत आहे. सुप्रीम कोर्टाने देखील त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. आता सत्तेत असलेले राज्यकर्ते साम दाम दंड भेद वापरून लोकशाहीला ठेच पोहोचवत आहेत. अशी टीका त्यांनी केली. 
पुढे ते म्हणाले, येणाऱ्या काळात सुप्रीम कोर्टाचा जर वेगळा निकाल लागला तर कदाचित महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येऊन विधानसभेच्या निवडणूका लागतील. महाराष्ट्रातील जनता शिंदे - फडणवीस सरकारला मतदानातून विरोध करायला उत्सुक आहेत. नियोजबद्ध निवडणुका लढविल्या तर यश आपलेच आहे.असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.To Top