संतोष देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

Admin

जत : डिजिटल हॅलो प्रभात (जॉकेश आदाटे)
 जत येथील युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते संतोष देवकर यांचा वाढदिवस सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी अनावश्यक खर्चाला फाटा देत शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. जत शहरातील विठ्ठलनगर येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी येथे लहान मुलांना जेवणाचे डबे, वही, पेन व खाऊवाटप करून शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजाराम सावंत, माजी उपनगराध्यक्ष आप्पासो पवार, रुपेश कांबळे, संतोष पाथरुट, मारुती साळे, दत्ता कांबळे आदीजन उपस्थित होते. To Top