कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे प्रतिबंधात्मक लसिकरण

Admin

५०० हून अधिक मुलींना मोफत लसीकरण 
कोल्हापूर : डिजिटल हॅलो प्रभात
 कोल्हापूर मेडिकल असोसिएशन यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ गार्गीस यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ते २० वर्षे वयोगटातील मुलींसाठी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर प्रतिबंध लसीकरण आयोजित करण्यात आले होते. कॅन्सर पेशंट ऍड असोशियन इंडिया एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर, रिसर्च स्टडीज ॲडिशनल प्रोजेक्टचे 
डॉ. धनंजया सारनाथ यांच्या विशेष सहकार्यातून ही लस मोफत उपलब्ध करण्यात आली. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन हॉलमध्ये सकाळी ८ ते २ या वेळेत ही लसीकरण मोहीम पार पडली असून याचा लाभ पाचशेहून अधिक मुलींनी घेतला. यशोमंगल ट्रस्टच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ.राधिका जोशी,कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. गीता पिल्लाई यांनी विशेष परिश्रम घेतले तर सनराइज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,हिरकणी फाउंडेशनच्या जयश्री शेलार, डॉ. वैदेही टोके तसेच सी,पी,ए,ए, च्या भावना शर्मा, प्रिया प्रसाद, गीता हसुरकर, वर्षा कुराडे, वनिता संस्थेच्या अनुराधा संकपाळ यांचे सहकार्य लाभले. तसेच पिंक इंडिया टीमच्यावतीने पिंक कार रॅली काढून लसीकरण बाबत जनजागृती करण्यात आली.
यावेळी मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. गीता पिल्लाई, सचिव डॉ. ए.बी पाटील, डॉ. राजेंद्र वायचळ, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने
डॉ. प्रिया शहा, डॉ. नंदकुमार जोशी,डॉ. जयदीप जोशी,डॉ. हेमा दातार यांच्यासह मुली व त्यांचे पालक उपस्थित होते


To Top