महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम साजरे

Admin


 सांगली : डिजिटल हॅलो प्रभात 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत अनघा ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, मनोबल फाउंडेशन व ज्ञानदा लोकजागृती सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने सांगली येथील ग्रोविंग चाइल्ड प्ले स्कूल आणि रघुनंदन बाल मंदिर,शाळेत महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संस्थेच्या अध्यक्षा अनघा कुलकर्णी, सचिव अजित समीर, 

समीर कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याधापिका सौ. नाईक यांनी महिला दिनाचे महत्व सांगत सर्व महिलांनी स्वयंरोजगार करून स्वतःच्या पायावर उभे राहावे असे आवाहन केले. यावेळी शाळेतील मुलांच्या पाल्यांनी विविध वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यानंतर महिलांच्या गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांचा अनघा कुलकर्णी,गाथा जगदाळे,तेजस्विनी देसाई यांच्या हस्ते,सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला,या कार्यक्रमाला सुषमा कोलप, दीपाली ओतारी,पूजा गोरनाळ, सई पेंडसे,तनुजा चव्हाण,पूनम उपाध्ये,रजनी माळी,सोनाली घोरपडे,दीपा खाडीलकर उपस्थित होत्या. 


To Top