रघुनंदन बाल मंदिर शाळेत होळीचा सण साजरा

Admin

 


मिरज : डिजिटल हॅलो प्रभात 

 येथील अनघा ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था संचलित रघुनंदन बाल मंदिर शाळेत होळीचा सण साजरा करण्यात आला.अंधश्रद्वांची होळी करुया!, जातीभेदांची होळी करुया!, द्वेषभावनांची होळी करुया! अशा घोषणा देत येथील रघुनंदन बालक मंदिरात विद्यार्थ्यांनी नुकतीच शाळेत होळीचा सण साजरा केला. होळीपौर्णिमे निमित्त शाळेत होळीच्या सणाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील शिक्षकांच्या देखरेखीखाली मुलांनी होळीच्या सणाचे आयोजन केले होते. यावेळी शाळेतील शिक्षकांनी पर्यावरणपुरक होळी, होळीच्या सणामागची भावना, होळीचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक अजित वडर यांच्यासह,ज्ञानदा लोक जागृती वाचनालय अध्यक्ष ऋतुजा वडर, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिया नाईक,पूनम उपाध्ये,तनुजा चव्हाण,दीपा खाडिलकर आदी उपस्थित होत्या.To Top