सरकारचे धोरण शेतकऱ्यांना मारक ठरत आहेत : किशोर तिवारी

Admin

इस्लामपूर : डिजिटल हॅलो प्रभात 

आजच्या काळात शेतीच उत्पादन वाढलं आहे पण पिकाचा भाव कमी झाला. सरकारची धोरणे ही शेतकरयांना मारक ठरत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आपला शेतकरी स्पर्धा करू शकत नाही असे प्रतिपादन शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केले .ते येडेनिपाणी ता वाळवा येथे जय किसान मंडळ आयोजित स्व.पद्मभुषण डॉ.वसंतदादा पाटील यांच्या ३४ व्या स्मृती व्याख्यानमालेत बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी व्ही एस आय चे शास्त्रज्ञ डॉ आबासाहेब साळुंखे  उपस्थित होते. किशोर तिवारी हे आजचा शेतकरी आणि उद्याच भविष्य या विषयावर बोलताना पुढे म्हणाले शेतकरयांचे मुळ प्रश्न सुटत नाहीत आणि त्यासाठी शेतकरयांचे प्रश्न सरकारने शेतकऱ्यांचे बांधावर जाऊन जाणुन घ्यायला पाहिजेत. विदर्भात होणार्रा शेतकरयांच्या आत्महत्या ह्या आत्महत्या नसुन हत्या आहेत. याचबरोबर शेतकर्यांनी बहुपीक प्रणाली अवलंबली पाहीजे.

यावेळी अध्यक्षस्थानी व्ही एसं आय चे शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंखे उपस्थित होते ते म्हणाले पीकाला कोणती माती हवी आणि कोणत्या मातीला कोणतं पीक हवं हेच शेतकर्याला कळत नाही. लागवडीसाठीचा खर्च वाढला, शेतीचा खर्च वाढला पण शेतातील आधुनिकता वाढली का यावर विचार करायला हवा. शेतकरयांसाठी झटणाऱ्या वसंतदादा च्या स्मृती ना उजाळा देत चालवलेली व्याख्यानमालेची चळवळ विशेष आहे. यावेळी शेतकरी नेते रघुनाथ पाटील, शंकरराव चव्हाण, मंडळाचे संस्थापक पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील, डॉ.दिपक स्वामी, शंकर पाटील उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक अजिंक्य पाटील यांनी केले. आभार विजय पाटील यांनी मांडले, तर सूत्रसंचालन प्रा.स्वप्निल पाटील यांनी केले.



To Top