ओसाड माळरानावर आंबा-केळी सह फळझाडांची लागवड

Admin

३ लाखा पर्यंत उत्पन्न ;वेगळ्या उपक्रमामुळे कामेरी परिसरात कौतुकाचा विषय 

इस्लामपूर : डिजिटल हॅलो प्रभात 
कामेरी (ता.वाळवा) : येथील माजी ग्रामपंचायत सदस्य  विनायक वसंतराव पाटील यांनी ओसाड माळावर पंचवीस हून अधिक प्रकाराच्या दोनशे हून अधिक विविध फळझाडांची  लागवड करून मळाच फुलवला आहे. या लागवडीतून त्यांना अडीच ते तीन लाखांचे वार्षिक उत्पन्न मिळते. पुणे बेंगलोर  राष्ट्रीय महामार्गा पासून 2 किलोमीटर अंतरावर शिवपुरी  च्या जवळ असणाऱ्या बिरोबा डोंगराच्या पायथ्याशी गोचार नावाने ओळखली जाणारी विनायक पाटील यांची पाच एकर खडकाळ  शेती आहे. त्यांनी यात ऊस हे नगदी पीक घेतले आहे. दीडशेहून अधिक आंब्याची झाडे  त्याच बरोबर फणस, रामफळ, सीताफळ, पेरू, आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी, चिक्कू  ड्रॅगन फूड,केळी, फणस,अशा फळझाडांची लागवड केली आहे. तसेच लवंग, दालचिनीही लावली आहे. वेळेवर पाणी, त्यांची देखभाल, खते देऊन या रोपांचे संगोपन चांगल्या प्रकारे केले आहे. विनायक पाटील यांना  शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याची आवड आहे. यापूर्वीही त्यानी या ठिकाणी गायी म्हैसीं पालन चा मोठा गोठा केला होता तो प्रयोग यशस्वी झाला नाही त्यानंतर त्यानी फळबाग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अनेक मित्रमंडळींच्या वाढदिवसा निमित्त वृक्ष भेट दिले आहेत. ऊस या नगदी पिका बरोबरच शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर व पडीक जमिनीत वृक्ष लागवड करून शेती सुजलाम् सुफलाम् करावी व पर्यावरणाचे रक्षण करावे असे ते म्हणाले. यापूर्वी त्यांच्या  ऊसाला गुंठ्याला दोन टनांपर्यंत उतारा पाडला आहे. ऊस या नगदी पिकाबरोबर फळझाडां पासून तीन ते चार लाखांचे वार्षिक उत्पन्न त्यांनी फळझाडापासून घेतले आहे. 
त्यांची ऊस शेतीबरोबर फळझाडांच्या लागवडीमुळे हा परिसरात वृक्ष लागवडीचा मळा म्हणून सर्वांना परिचित झाला आहे. कामेरी (ता.वाळवा) येथील विनायक पाटील यांनी  यांनी  कब्बडी खेळातही शिवाजी विद्यापीठ व राज्य स्तरावर आपली छाप पाडली होती.ओसाड माळावर केलेली आंबा व  अन्य फळझाडांची लागवड करण्यासाठी त्यांना जेष्ठ बंधू वाळवा तालुका स्टॅम्पव्हेडर असोसिएशनचे अध्यक्ष राकेश वसंतराव  पाटील व कुटुंबातील सर्वच सदस्यांचे प्रोत्साहन मिळते.


 

To Top