स्व.सा.रे.पाटील म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी झटणारे व्यक्तिमत्व : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

Admin

 

शिरोळ : डिजिटल हॅलो प्रभात 
वयाच्या ९३ व्या वर्षी विधानसभेची लढविणार डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील हे भयंकर जिद्दी व चिकाटी होते. शेतकऱ्यांचे कायम भले झाले पाहिजे, यासाठी त्यांचा प्रयत्न  होता. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम गणपतराव पाटील करीत आहेत,असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ते येथील स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा. रे.पाटील स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. अध्यक्षतेस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. 

          डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा. रे.पाटील समाजभूषण पुरस्कार माजी पोलीस महासंचालक डॉ.मीरा चड्डा-बोरवणकर यांना देण्यात आला. तसेच यावर्षीपासून नव्याने सुरवात करण्यात आलेला समाजकार्य पुरस्कार कृषी व जल तज्ञ सुधीर भोंगळे यांना तर युवा प्रेरणा पुरस्कार आंतरराष्ट्रीय नेमबाजपट्टू राही सरनोबत यांना देण्यात आला.
चव्हाण बोलताना पुढे म्हणाले की, डॉ.आप्पासाहेब उर्फ सा. रे.पाटील यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा प्रतिष्ठेचा व सन्मानाचा आहे. शेतकऱ्यांचे भले करण्याचे काम सा.रे.पाटील यांनी केले आहे. गणपतराव पाटील यांनी शिरोळ तालुक्यात क्षारपड जमीन सुधारणा कामाच्या माध्यमातून एक चांगला प्रयोग केला आहे. तालुक्यातील ८ ते १० गावातील क्षारपड जमिन सुधारणा कामास भेट दिल्यानंतर अत्यंत आनंद व अभिमान वाटला महाराष्ट्रात क्षारपड जमीन सुधारण्याचे काम वाढविण्यासाठी राज्य सरकारने अनुदान दिले पाहिजे असे म्हणाले. दरम्यान, चव्हाण यांनी पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या कार्याचा गौरव केला.अध्यक्षीय मनोगतात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी सा. रे.पाटील यांच्या कार्याला उजाळा देऊन गणपतराव पाटील करीत असलेल्या कामाचे कौतुक केले.
          दरम्यान सत्काराला उत्तर देताना माजी पोलीस महासंचालक मीरा चड्डा-बोरवणकर म्हणाल्या की, १९८५ साली अप्पासाहेबांचा माझ्याशी संपर्क आला. त्यांची सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत होती. पोलीस खाते नागरिकांच्या सहकार्याशिवाय काम करू शकत नाहीत. त्यांना आपल्या कामात नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असते. त्यामुळे पोलीस प्रशासनात काम करताना सर्वांना सोबत घेऊन कसे काम करावे हे मी अप्पासाहेबांकडून  शिकले असल्याचे त्या म्हणाल्या. सुधीर भोंगळे म्हणाले की, अप्पासाहेबांचा काळाचे अचूक भान होते. त्यांनी नेहमी शेतकऱ्यांचे हित पाहिले. सुरवातीच्या काळात कोंडीग्रे येथे सुरू केलेला ग्रीन हाऊस प्रकल्प १०३ एकरांवर त्यांनी पसरविला.  क्षारपड सुधारणेचे काम भारतातच नाही तर जगात कुठे झाले नाही ते गणपतराव पाटील यांनी करून दाखविले आहे.
आंतरराष्ट्रीय नेमबाजपट्टू राही सरनोबत म्हणाल्या की, माझ्या आजोबांचा कर्मभूमीत हा प्रतिष्ठेचा मिळालेला पुरस्कार माझ्या घरचा आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. अत्यंत जिद्द व चिकाटी बाळगून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत पोहचले आहे. या प्रवासात मी घरातील कोणत्याही चांगल्या- वाईट प्रसंगाला उपस्थित राहू शकले नाही. तुमचे सर्वांचे आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहोत  असे आवाहन केले.
            प्रारंभी उदगाव टेक्निकल हायस्कूलच्या विद्यार्थींनीनी स्वागतगीत व स्फुर्तगीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. मान्यरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करम्यात आले. स्वागत दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी केले. प्रास्ताविक पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष विनोद शिरसाट यांनी केले. दरम्यान,तालुक्यातील क्षारपडमुक्त शेतकरी संस्थेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आभार शेखर पाटील यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी आमदार सतेज पाटील,प्रकाश आवाडे,राजेंद्र पाटील यड्रावकर,माजी खा. कल्लाप्पाण्णा आवाडे,माजी आमदार उल्हास पाटील,नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, दत्तचे संचालक अनिलकुमार यादव, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव, अण्णासाहेब पाटील, माजी.जि.प.सदस्य अशोकराव माने, दत्तचे व्हा.चेअरमन अरुणकुमार देसाई,कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील,महेंद्र बागे, रणजितसिंह पाटील,सर्जेराव शिंदे यांच्यासह दत्त कारखान्याचे सर्व संचालक, दत्त उदयोग समूहाचे सर्व अधिकारी,कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


To Top