योगेश जानकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

Admin

 

जत : डिजिटल हॅलो प्रभात 
शिवसेनेचे जत तालुका संपर्कप्रमुख योगेश जानकर यांचा वाढदिवस शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त येथील जणसंपर्क कार्यालयात रक्तदान व मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जानकर यांच्या ठाणे येथील घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. 
वाळेखिंडी (ता.जत) येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात ६५ कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. ठाणे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. याचाही लाभ नागरिकांनी घेतला. जत येथील कार्यकर्त्यांनी ठाणे येथील निवासस्थानी भेट देऊन जानकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी सचिन मदने, तालुका प्रमुख अंकुश हुवले, महादेव हिंगमीरे, मारुती सागर, रमेश देवर्षी, उमदीचे निवृत्ती शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 


To Top