'माझं घर राहुल गांधींच घर' हे अभियान तालुक्यात घराघरापर्यंत पोहोचवू : ॲड.रवि पाटील

Admin

 

शिराळा : डिजिटल हॅलो प्रभात 
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षे कारावासाची केलेली शिक्षा,संसदेतून तडकाफडकी झालेली हकालपट्टी व लगोलग शासकीय निवासस्थान काढून घेण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरुद्ध देशभरात आज पत्रकार परिषदांचे आयोजन केले होते.त्याप्रमाणे शिराळा तालुका काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ॲड.पाटील बोलत होते. पाटील यांनी लक्षद्वीप चे खासदार मोहम्मद फजल यांचे वर अशाच पद्धतीने सुरुवातीला दहा वर्षाची शिक्षा, संसदेतून हकालपट्टी, उच्च न्यायालयाची शिक्षा स्थगिती व पुढे न्यायालय आणि त्यांचे सदस्यत्व कायम करणार तोपर्यंत केंद्राचा आदेश मागे घेणे या घटनाक्रमाप्रमाणे मोदी सरकार राहुल गांधींना घाबरवतील असे वाटत असेल तर हा त्यांचा गोड गैरसमज आहे. 
गांधी कुटुंबियांचा इतिहास साऱ्या जगाला माहित आहे. काँग्रेस पक्षांना देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं,लोकशाहीचा प्रमुख आधारस्तंभ राहीलेल्या काँग्रेसला संपवलं की, कोणाचा आवाज शिल्लक राहणार नाही. या सुड भावनेनं होत असलेल्या कारवाईचे तालुका काँग्रेसकडून धिक्कार करण्यात आला. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने चांदोली धरण,मोरणा धरण आणि विविध पायाभूत सुविधांच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण  विकास केलेला आहे.त्याची भरपाई म्हणून राहुल गांधींचे शासकीय निवासस्थान काढून घेण्यात आले तरी तालुक्यातील जनता  'माझे घर राहुल गांधींचे घर' अभियान घरोघरी राबवतील आणि काँग्रेस पक्षाच्या मागे भक्कमपणे उभे राहतील असे सांगितले.

      जिल्हा सरचिटणीस श्री नंदकुमार शेळके यांनी मोदी सरकारच्या लोकशाही मोडीत काढण्याच्या दडपशाही धोरणाचा  तीव्र शब्दात निषेध केला.ज्येष्ठ काँग्रेस नेते वाळव्याचे श्री बजरंग थोरात यांनी शिराळा- वाळवा पेठ्याची माती ही काँग्रेस विचाराची आहे यापुढे तालुक्यातील प्रत्येक नागरिक स्वतः राहुल गांधी समजून पेटून उठेल असे सांगितले; तर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष श्री राजाभाऊ चरणकर यांनी थोर स्वातंत्र्यसेनानी बाबुराव चरणकरांचा वारसा या तालुक्याला लाभलेला आहे. गांधीवादी विचाराची मूल्ये जोपासण्याचे काम तालुक्याने वेळोवेळी केले आहे.देशाची लोकशाही संकटात आल्यानंतर जनता गप्प बसणार नाही असे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष श्री पोपट कदम, ॲड. तनुजा जाधव, ॲड. स्नेहल पाटील, ॲड.हर्षदा कडवेकर आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.To Top