जिल्हा परिषद शाळा निगडीचे विविध स्पर्धेत यश

Admin

 

शिराळा : डिजिटल हॅलो प्रभात
सांगली जिल्हास्तरीय कब बुलबुल व स्काऊट गाईड जिल्हा  मेळाव्यात जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा निगडी तालुका शिराळा यांनी विविध स्पर्धेमध्ये सुयश मिळवलेले आहे. 1) तंबू सजावट- प्रथम क्रमांक 2) शेकोटी कार्यक्रम - द्वितीय क्रमांक  3)  संचालन - तृतीय क्रमांक 4) शोभायात्रा - तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे .सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी सन्माननीय मोहनराव गायकवाड साहेबांच्या हस्ते सर्व विद्यार्थी व फ्लॉक लीडर  करुणा बाबुराव मोहिते व  नंदिनी महादेव हवलदार यांचा शील्ड व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.या यशाबद्दल शिराळा तालुक्याचे गटविकास अधिकारी संतोषजी राऊत साहेब, गटशिक्षणाधिकारी अरविंद माने साहेब पंचायत समिती शिराळा, विस्तार अधिकारी विष्णू दळवी साहेब, केंद्रप्रमुख रोकडे साहेब व माने साहेब तसेच तसेच भोळे मॅडम, नंदकुमार पाटील, अरविंद सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.निगडी शाळेचे मुख्याध्यापक विलास घागरे,सुनील पाटील,आमने मॅडम ,भालेकर मॅडम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य पालक  व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


To Top