पलुस बॅक राज्यात अग्रेसर ठरेल : सादिक खाटीक

Admin

 


आटपाडी : डिजिटल हॅलो प्रभात 

                आटपाडी तालुक्याच्या विकासात पलुस सह . बॅक मोलाची भूमिका बजावेलच तथापी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बँकेच्या शाखा विस्तार आणि उत्तुंग कारभारातुन पलुस सह . बॅक राज्यात अग्रेसर ठरेल . अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी येथे बोलताना व्यक्त केली .
                प्रारंभी पलुस बँक शाखेचे उदघाटन सिद्धराम जाधव यांचे हस्ते तर एटीएम बँकीग सुविधेचे उदघाटन सादिक खाटीक, रामभाऊ साळुंखे यांच्या हस्ते आणि बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले, व्हा चेअरमन प्रकाश पाटील, एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे आटपाडी तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील, वीरशैव पतसंस्था आटपाडीचे चेअरमन सतीश भिंगे इत्यादी मान्यवरांच्या सन्माननीय उपस्थितीत करण्यात आले .
                पलुस बँकेचा कारभार एकूण २४ शाखेतून सुरू आहे. आटपाडीची शाखा २२ वी आहे . ४५७ कोटीच्या ठेवी,  ३२१ कोटी रुपयांचे कर्ज वाटप, बॅकेचा ऑडीट वर्ग सतत अ आहे . १४ शाखेत स्वतःची एटीएम आयएमपीएस सेंटरची सुविधा उपलब्ध आहे. शिवाय आरटीजीएसटी ची सुविधा उपलब्ध केली आहे. सभासदांना ११ % लाभांश दिला असून वाहन कर्ज, गृह कर्ज आणि सोनेतारण कर्ज दर साल दर शेकडा ९ टक्के व्याजदराने आम्ही देत आहोत . आटपाडी व परिसरातील नागरिकांनी आमच्या बँकेवरती विश्वास ठेवून बँकेमध्ये आपला व्यवहार सुरू करावा अशी अपेक्षा बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले यांनी यावेळी व्यक्त केली .
                सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, जि . म . सह . बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी उदघाटन सोहळ्या दरम्यान उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या .
                उपस्थितांचे स्वागत बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले, व्हा . चेअरमन प्रकाश पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल घारे, उपव्यवस्थापक प्रकाश डाके, संचालक सर्वश्री ईश्वर शिसाळ, चंद्रकांत गोंदील, मनोहर बुचडे, नितीन खारकांडे, शिवप्रसाद शिंदे, अशोक माने, प्रकाश कारंडे, लालासो पाटील, जगदीश मोहोळकर, बळवंत सूर्यवंशी, पुष्पराज पवार, मेघा येसूगडे , अश्विनी गोंदील, प्रकाश भोरे, नितेश शहा इत्यादींनी केले .
                सांगली जिल्ह्याचे दिवंगत काँग्रेस नेते वसंतराव पुदाले साहेबांच्या प्रेरणेतून नावारूपास आलेल्या पलुस बँकेने २४ शाखा सह ८०० कोटी पर्यतचा उलाढालीचा गाठलेला टप्पा प्रेरणादायी आहे . लाखो परिवारांच्या आर्थिक सुबत्तेत मोलाची भूमिका बजावू पाहणाऱ्या पलुस बँकेला आटपाडी तालुक्यात अच्छे दिन येणारच आहेत . आटपाडी तालुक्याच्या आर्थिक परिवर्तनात इतर अनेक बँका प्रमाणेच पलुस बँक ही आग्रही भूमिका बजावेल . आटपाडी तालुक्यातील युवक, युवतींना नोकरीच्या माध्यमातून या शाखेत सामावून घेतले जावे . कोणत्याही जाती धर्माच्या रुग्णाला इतर कोणत्याही जाती धर्माच्या रक्तदात्याचे रक्त जीवदान देत असेल तर मानवताच श्रेष्ठ ठरते . मानवता आणि समानतेच्या भावनेने बँकेने प्रत्येक ग्राहकांशी सुसंवाद आपुलीकी निर्माण करावी . बँकीग क्षेत्र, दुध व्यवसाय, विविध संस्था नावारूपास आणणारे जि.प . चे माजी अध्यक्ष, बाबासाहेब देशमुख सह बँकेचे संस्थापक अमरसिंहबापू देशमुख यांचे ही सहकार्य बँक पदाधिकाऱ्यांनी घ्यावे. अशा भावनाही सादिक खाटीक यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केल्या .
                यावेळी शंकरबापू चव्हाण, जयदीप चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, पलुसचे नगराध्यक्ष परशुराम शिंदे , अशोक मोरे, बाजार समितीचे संचालक संजय पवार , धोंडीराज सोसायटीचे चेअरमन विलास हजारे , विश्वास माळी ,अरविंद वाघमारे, संजय पवार, गटनेते सुहास पुदाले, अधिक जाधव, भीमराव भोरे, एम. आर. पुदाले, मार्तंड सदामते इत्यादी अनेक मान्यवरांनी उपस्थित रहात शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उप व्यवस्थापक प्रकाश डाके यांनी केले तर आभार उपव्यवस्थापक राजेंद्र जाधव यांनी मानले


To Top