हेरले घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनेचा निषेध मोर्चा

Admin

 

हुपरी :   डिजिटल हॅलो प्रभात 
        हेरले (ता.हातकणंगले) येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी छ.शिवाजी महाराज नगर येथून छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला प्रारंभ झाला. जय श्रीराम व छत्रपती शिवाजी महाराज की जय चा जयघोष करीत मोर्चा गाव भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आला आणि  निषेध मोर्चा विसर्जित करण्यात आला. हेरले प्रकरणातील समाज कंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अशा समाज कंटकावर कडक कारवाई करावी.अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यानी केली. हुपरीतील व्यापाऱ्यांनी देखील आपली दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. यामुळे हुपरीत शुकशुकाट होता.To Top