सेवकांची सह.पतसंस्थेचा रौप्य महोत्सव उत्साहात साजरा

Admin

 

पंढरपूर : डिजिटल हॅलो प्रभात 

    पेड (ता.तासगाव) येथील महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था, सांगली सेवकांची सह.पतसंस्थेचा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रौप्य महोत्सवानिमित्त  म.दे.अ.हो.एज्यू. सो. चेअरमन आर.एस. चोपडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले .ही पतसंस्था २५ व्या वर्षात पदार्पण करीत असल्यामुळे यावेळी पतसंस्थेची प्रगतीकडे वाटचाल व नवीन उपक्रम राबवण्याचे ठरले .रौप्यमहोत्सवी वर्षानिमित  पतसंस्थेचे अध्यक्ष टी.बी.लोखंडे तसेच उपाध्यक्ष ए.एन.सलगर यांनी मार्गदर्शन केले. सर्व संचालकांनी विविध उपक्रम कसे राबवावेत याविषयी चर्चा केली. यामध्ये ८ टक्के व्याजदर, सभासद वाढवणे, तीन महिन्यानंतर कॅम्प घेणे, ठेवी ठेवणे, सभासद करून घेणे सभासदांना भेटवस्तू तसेच पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप ,स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण,मेरीट झालेल्यांना बक्षीस, याव्यतिरिक्त अनेक प्रगतीच्या दृष्टिकोनातून विचार करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन आर.एस.चोपडे, व्हा.चेअरमन श्रीमती एल.टी.शेंडगे, सल्लागार सौ.उषाताई चोपडे, एस.के.कदम, एस.व्ही.शेळके,एच.के.चव्हाण, संस्थेचे सचिव व पतसंस्थेचे सल्लागार

        एस.ए.पाटील, पतसंस्थेचे अध्यक्ष टी.बी लोखंडे, उपाध्यक्ष ए.एन.सलगर, सचिव प्राध्यापक एच.बी.पाटील यांचा श्रीफळ शाल देऊन पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे संचालक प्रवीण वाघमोडे, भरत नलवडे, बाळू कलढोणे, श्रीमती सुनिता ठोंबरे, पवार एस एम, श्रीमती दिपाली शेंडगे,आबासाहेब व्हनमाने, शिवाजी कोळी, संजय शिंदे उपस्थित होते. आभार पतसंस्थेचे उपाध्यक्ष आबासाहेब सलगर यांनी मांनले.


To Top