नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना गंडा : पोलिसांत तक्रार

Admin

 

सांगली : डिजिटल हॅलो प्रभात
                    होतकरू तरुण-तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून सेमीनारला बोलावून घ्यायचे, त्यांना ‘नोकरीत काय ठेवले आहे, तुम्ही आमची उत्पादने विका, विदेशात विमानातून फिराल, स्वतःची चारचाकी घ्याल’, असे आमिष दाखवायचे, प्रकार सुरु आहेत. अशा एका हर्बल उत्पादक कंपनीच्या कोल्हापूर रस्त्यावरील रेग्यूलर कॉर्नरला सुरु असलेल्या सेमीनारचा आज भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी पंचनामा केला. या कंपनीविरोधात सांगली शहर पोलिसांत तक्रार अर्ज दिला.
                    प्रत्येक किमान साडेतीन हजार रुपयांना टोपी घालून बाजारात उपलब्ध नसलेली उत्पादने विक्रीसाठी त्यांच्या गळ्यात घातली जात होती. ती आजच घेतली तर साडेतीन हजारात मिळतील, उद्या घ्याल तर साडेसात हजार भरावे लागतील, अशी फसवी कोंडी करून तरुणांना लगेच जाळ्यात अडकवण्याचा खेळ सुरु होता. त्याबाबत विचारले असते कंपनी प्रतिनिधींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना हे प्रकार थांबवा, असा इशारा देतानाच या प्रकाराविरुद्ध अभिमन्यू भोसले यांच्या माध्यमातून शहर पोलिसांत तक्रार दिली. अन्न-औषध प्रशासनाने याबाबत संपर्क साधला असून त्यांनीही याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
तक्रारदारांनी पुढे यावे
अशा कंपन्यांच्या आमिषाला शेकडो मुले बळी पडली आहेत. त्यांनी मारुती चौकात येवून आमच्याकडे तक्रार करावी. शक्यतो, पुराव्यांसह तक्रार द्यावी. या फसव्या साखळीला दणका द्यायची, हीच वेळ आहे, असे पृथ्वीराज पवार यांनी आवाहन केले. विजय साळुंखे, शुभम चव्हाण, राकेश पाटील आदी उपस्थित होते.
                    पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘‘एका सजग सांगलीकराने आमच्याकडे तक्रारी केल्यानंतर आम्ही सेमीनारला भेट दिली. सुट, कोट, चकचकीत बूट, टाय परिधान केलेले तरुण आणि तरुणी हे कंपनीचे प्रतिनिधी आहेत. समोर शंभराहून अधिक होतकरू, बेरोजगार, परिस्थितीने जेरीला आलली मुले-मुली बसली होती. पन्नास रुपये भरून त्यांनी नाव नोंदणी केली. त्यांना नोकरी देतो, असे आमिष दाखवून बोलावण्यात आले होते. सेमीनारमध्ये त्यांनी उत्पादने कशी विकायची, त्यातून कसा फायदा होतो, जास्त विकल्यास विदेशात विमानातून फिरण्याची, गोव्याला जाण्याची, वर्षाला लाखो रुपये मिळवण्याची कशी संधी आहे, याबाबत ‘ब्रेन वॉश’ केला जात होता.
To Top