महिलांच्या चारित्र्यावर उडविलेले शिंतोडे सहन करणार नाही : भाजपा महिला मोर्चा

Admin

 
पोलिस निरिक्षकांना  निवेदन देताना

इस्लामपूर : डिजिटल हॅलो प्रभात

                    महिला नेत्या चित्राताई वाघ यांची व्टिटर वरून बदनामी व मानहानी केल्या प्रकरणी आणि बदनाम कारक मजकूर टाकल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी इस्लामपुर पोलिस निरिक्षकाना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आ. जितेंद्र आव्हाड यांनी ९ जून रोजी रात्री १२ वाजून ५३ मिनिटांनी चित्राताई वाघ यांच्या संदर्भात बदनामीकारक मजकूर व्टिटर वर अपलोड करून चित्राताई वाघ यांची मानहानी करण्याचा, त्यांना बदनाम करण्याचा त्याच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा आणि सामाजिक जीवनातून उठविणाचा प्रकार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. भाजपा महिला मोर्चाच्या प्रतिनिधी समाजात महिला सबलीकरण करण्याचे तसेच सामाजिक स्तरावर महिलांना सक्षम बनविण्याचे काम करतीय. जिथे जिथे महिलेवर होतोय तिथे तिथे आम्ही आवाज उठिवतो. भाजपा प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा चित्राताई वाघ यांचे चारित्र्यहरण करण्याचा प्रकार राष्ट्रवादीचे मुंब्रा मतदार संघाचे आ.जितेंद्र आव्हाड करत आहेत,हे पाहता एक महिला म्हणून आम्ही शांत बसू शकत नाही . राजमाता जिजाऊ,सावित्री बाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले जात आहेत हे कदापि सहन केले जाणार नाही.
                    यावेळी भाजपा महिला मोर्चा वाळवा तालुका अध्यक्षा सुरेखाताई जगताप,भाजपा इस्लामपुर मंडल महिला मोर्चा अध्यक्षा स्मिता पवार,सरपंच ग्रा. पं. नरसिंहपुर शोभा भाजपा महिला मोर्चा सदस्य सांगली जिल्हा वंदना धोरात,भाजपा महिला मोर्चा वाळवा तालुका उपाध्यक्षा विजयमाला पाटील,भाजपा इस्लामपुर शहर मंडल महिला मोर्चा उपाध्यक्षा अश्‍विनी पाटील,भाजपा इस्लामपूर शहर मंडल महिला मोर्चा सदस्या समृध्दी पाटील यांसह अनेक पदाधिकारी व महिला कार्यकत्या उपस्थित होत्या.
To Top