५० हजार रुपयाची लाच स्विकारताना तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

Admin

 

सांगली : डिजिटल हॅलो प्रभात
                    बेकायदा वाळू साठ्याबद्दल कारवाई न करण्यासाठी ५० हजार रुपये लाच घेतल्याबद्दल करजगी (ता. जत ) येथील तलाठी बाळासाहेब शंकर जगताप ( वय ५७ रा. आसंगी) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. अधिक माहिती अशी,तक्रारदार यांच्या घराचे बांधकाम सुरू असून बांधकामासाठी वाळू आणली आहे. तलाठी जगताप याने सदरचा वाळूसाठा बेकायदा असून त्याबद्दल कारवाई न करण्यासाठी ५० हजार रूपये लाचेची मागणी केली. त्याबद्दल तक्रारदार यांनी १२ जून रोजी लाचलीचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिला . तक्रारीनुसार पडताळणी केली असता तलाठी जगताप याने तक्रारदाराने बेकायदा वाळू साठवणुक केली म्हणून कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज तलाठी जगताप याच्या राहत्या घराजवळ सापळा लावला. तेव्हा तक्रारदाराकडून ५० हजार रुपये लाच रक्‍कम स्विकारली असता रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरीध्द उमदी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
To Top