कै.विश्वासराव नाईक भाऊ यांची जयंती साजरी

Admin
शिराळा : डिजिटल हॅलो प्रभात
                  चिखली (ता.शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात आज कै. विश्वासराव नाईक (भाऊ) यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कारखान्याचे संचालक विराज नाईक, तालुक्याचे माजी सभापती सम्राटसिंग नाईक, युवा नेते भूषण नाईक व कार्यकारी संचालक अमोल पाटील यांच्या हस्ते कारखाना स्थळावरील पुतळ्याचे व प्रतिमेचे हार घालून पूजन केले. विश्वासरावभाऊंनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार विश्वास उद्योग समुह शेती व शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. कै. भाऊंनी पाहिलेले आद्योगिक प्रगतीचे व बेरोजगारांच्या हातास काम देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘विश्वास’ उद्योग सातत्याने प्रयत्नशील आहे, असे मत संचालक विराज नाईक यांनी व्यक्त केले. यावेळी कारखाना व्यवस्थापक दीपक पाटील, विश्वास कामगार संघटनेचे अध्यक्ष टी. एम. साळुंखे, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस विजयराव देशमुख, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, सचिव सचिन पाटील यांचेसह सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.
To Top