आजच्या जीवनात योग गरजेचा : आशा नलवडे

Admin

 

शिराळा :  डिजिटल हॅलो प्रभात
                आज धावपळीच्या जीवनात शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी योग गरजेचा आहे.
असे प्रतिपादन वरिष्ठ मुख्याध्यापक सौ.आशा विठ्ठल नलवडे यांनी शिराळा येथे दत्त मंदिरात योग संजीवन वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक, पत्रकार विठ्ठल नलवडे होते. प्रारंभी विठ्ठल नलवडे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. या वेळी बोलताना सौ आशा नलवडे पुढे म्हणाल्या की शिराळा शहरात योग संजीवनी वर्ग मोफत सुरू करण्यात आला आहे. याचा लाभ महिलांनी घ्यावा. आपल्याला असणाऱ्या व्याधी नक्की दूर होण्यास योग मुळे मदत होईल.या वेळी बोलताना विठ्ठल नलवडे म्हणाले की शिराळा शहरात योग, प्रवेश परिचय वर्ग संपन्न झाले यास चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.योग विद्याधाम पेठ, इस्लामपूर हून येणाऱ्या योग शिक्षक मोठे योगदान आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. ती टिकवण्यासाठी योग करणे आवश्यक आहे. योग अभ्यासामुळे व्याधी दूर होतात. तसेच दैनंदिन कोणता आहार घ्यावा याचे ज्ञान होते.
                या वेळी माजी नगराध्यक्षा , सौ सुनिता निकम, सौ प्रतिभा पवार, वेळी सौ जयश्री बाऊचकर, कल्पना गायकवाड, राजश्री पाटील, भक्ती जोशी, गौरी यादव, नेत्रा जोशी, वैशाली पाटील,नाझीया अत्तार, विजया गायकवाड, अनुराधा शेटे, कांचन कांबळे, स्वाती पाटील आभार सौ जयश्री बाऊचकर यांनी मानले.
To Top