जयसिंगपूर : डिजिटल हॅलो प्रभात
जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या कॉम्प्युटर सायन्स व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेतील १६ विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी व ऊजविलास या नामांकित सॉफ्टवेअर कंपनीमध्ये निवड झाली अशी माहिती महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ.सुनील आडमुठे यांनी दिली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम व व्हाईचेअर पर्सन डॉ. सोनाली मगदूम यांनी केले.
महाविद्यालयातील शंभर टक्के प्लेटमेंटचा टप्पा पूर्ण करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग सतत कार्यरत आहे. नवीन तंत्रज्ञानाचे शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांच्या मागण्यानुसार सक्षम बनवणे व मोठे पॅकेज देणाऱ्या कंपन्यांमध्ये त्यांची निवड करून नोकरीची संधी उपलब्ध करून देणे हे महाविद्यालयाचे काम आहे असे मत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शुभांगी पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना व्यक्त केले.

"कॅपजेमीनीमध्ये" निवड झालेल्यापैकी कॉम्प्युटर सायन्स विभागाचे मनाली नरुटे , अदिती पाटील , किरण नरोटे, सौरभ डावरे, सिद्धी कुंडले, जीवन पाटील, तर आयटी विभागाचे प्राजक्ता पाटील व प्रज्वल सरनोबत हे विद्यार्थी आहेत. "उज्विलास टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअर" या कंपनीमध्ये कॉम्प्युटर विभागाचे चार तर आयटी विभागाचे चार असे एकूण आठ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. कोमल ढोक, हर्षल चांदोबा, विवेक आडमुठे, प्रमोद पवार, दिपाली पोतदार, जुनेद शेख, श्रेयश महामुनी, सियांग कांबळे विद्यार्थ्यांची निवड झाली. या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक पी.पी.माळगे, सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉर्डिनेटर व विभाग प्रमुख यांचे सहकार्य विद्यार्थ्यांना लाभले.