बालचमूच्या किलबिलाटानी शाळा गजबजल्या

Admin

 

शिरोळ : डिजिटल हॅलो प्रभात
                   शैक्षणिक वर्षातील शाळेच्या पहिला दिवस कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करून नवागतांचे पाठ्यपुस्तक गणवेश शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १५३ प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात १२४० विद्यार्थी आणि १२४६ विद्यार्थिनींनी असे एकूण २४८६ विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी प्रवेश घेतला त्यामुळे शाळेचा आवार तब्बल दीड महिन्यानंतर पुन्हा बालचमूच्या किलबिलाटानी गजबूजून गेला आहे. शिरोळ पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून शाळेतील नवागत विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा पट वाढावा यासाठी गटशिक्षणाधिकारी सौ. भारती कोळी, विस्तार अधिकारी दीपक कामत अनिल ओमासे सर्व केंद्रप्रमुख शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले. यामुळे तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
शिरोळ शहरात मोठ्या उत्साहात नावागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. येथील शाहू विद्यामंदिर शाळा क्र.१ व कन्या विद्यामंदिर शाळा क्र.२ या ठिकाणी विद्यार्थ्यांचा स्वागत सो'हळा उत्साहात संपन्न झाला. 
                    जायटंस क्लब ऑफ सहेली शिरोळच्या अध्यक्षा सौ.सारिका अरविंद माने व अशोकरत्न पेट्रोलियमच्या अध्यक्षा सौ. अश्विनी गायकवाड, सौ. हेमा जाधव, सौ. स्नेहल कुलकर्णी यांच्या हस्ते गणवेश शैक्षणिक साहित्य पाठ्यपुस्तक आणि गोड भोजन देवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच अंगणवाडी क्र.१४ मधील अंगणवाडी बालकांना पाटी/पेन्सिल भेट देवून चिमुकल्याचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापिका सौ.विमल वर्धन व सौ.वहिदा मुल्ला,माजी मुख्याध्यापक भगवान कोळी, अध्यापक रमजान पाथरवट ,धनाजी आवळे, बाळासाहेब कोळी दीपक वावरे भारती इंगळे सतीश नलवडे दीपमाला कोळी राजश्री टोणे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी ,पालकवर्ग,विध्यार्थी, मोठ्या संखेने उपस्थित होते. केंद्रीय कन्या शाळा दत्तनगर या ठिकाणी नवागत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. नवागतांचे स्वागत करून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना गणवेश पाठ्यपुस्तक आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी गोड भोजन देण्यात आले. शहरातील सर्वच प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशोत्सवानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी मोठ्या संख्येने दाखल झाल्याने संपूर्ण परिसर बालचमुच्या किलबिलाटाने पुन्हा गजबुजून निघाला होता.


To Top