गौरव गुळवणी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

Admin

 

विटा : डिजिटल हॅलो प्रभात
    मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य समन्वयक गौरव गुळवणी यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर व विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य व विनोद भाऊ युवा मंच,विटा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेतले जाणार आहे.
 रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून काम करणारे तसेच शेकडो रुग्णांना मदत करणारे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक गौरव गुळवणी यांचा  दिवस असो की रात्र मदतीला गौरव बाबा तत्पर असा  विशेष नावलौकिक आहे. वाढदिवस औचित्य साधून रक्त टंचाईच्या पार्श्वभूमीवर  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  सोमवार दिनांक १२ जून रोजी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी विटा येथे हे शिबिर संपन्न होणार आहे. प्रत्येक रक्तदात्यास एक पिशवी रक्त दोन वर्षापर्यंत मोफत व दुसरी पिशवी सवलती मध्ये मिळण्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राहावी म्हणून २४  तास जागृत असणारे पोलीस बांधव यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे ही आयोजन त्या दिवशी करण्यात आले आहे.
     महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खा.श्रीकांत शिंदे, आमदार व उपनेते अनिलभाऊ बाबर, मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, रामहरी राऊत व  विनोद गुळवणी यांच्या मार्गदर्शनाखाली गौरव गुळवणी हे सामाजिक उपक्रम राबवत आहेत. सदर शिबिरासाठी सिनर्जी हॉस्पिटल सांगली यांचेही सहकार्य लाभणार आहे. रक्तदान शिबिरासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


To Top