माधवनगर रोड नागरिकांचा विचार करून बंद करावा : आनंद लेंगरे

Admin

 

सांगली :डिजिटल हॅलो प्रभात
सांगली-माधवनगर रस्ता बंद करून ज्या मार्गाने वाहतूक वळवली आहे तो मार्ग अरुंद व खड्डेमय असून वाहतुकीस प्रचंड अडथळा होणार आहे. यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होणार असून याबाबत आपण यामध्ये लक्ष घालून नागरिकांना व विद्यार्थी विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी मदनभाऊ पाटील युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
10 जून पासून माधवनगर रोड वरील चिंतामणनगर रेल्वे ब्रिज कामानिमित्त बंद करण्यात येणार असून सदर मार्गावरील वाहतूक बायपास मार्गे जुना बुधगाव रस्ता या मार्गावरून संपत चौकात वळविण्यात आलेली आहे. जुना बुधगाव रेल्वे गेट ते संपत चौकाकडे वळण घेणारा मार्ग अतिशय अरुंद व खड्डेमय असल्यामुळे वाहतुकीस प्रचंड अडथळा होणार आहे. सदर मार्गावर शांतिनिकेतन महाविद्यालय असून विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय आहे. येत्या 15 जून पासून शाळा सुरू होत आहेत. या अरुंद व खड्डेमुळे रस्त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. सदर रस्त्यावरील रुंदीकरण व रस्ता करणे ही तातडीची गरज आहे. तसेच चिंतामण नगर मधून तात्यासाहेब मळा (जासूद मळा) ते मीरा हाऊसिंग सोसायटी मार्गे स्व. मदन भाऊंचा पुतळा हा रस्ता दुचाकी, तीन चाकी, चार चाकी साठी उपलब्ध करून दिल्यास जवळपास 40 टक्के रहदारी या मार्गाने होणार आहे. तसेच या परिसरातील जवळपास 40 हजार हून अधिक लोकांना याचा थेट फायदा होणार आहे.  या मागणीचा  सकारात्मक विचार केल्यास भविष्याचा आनर्थ टाळणार आहे. असेही निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.


To Top